Home  |  About Us  |  Gallery / Events  |  Contact Us  |   Member Search  |  Financial Assistance  |  Career  |  Matrimony

NEWS ALERT * IESL Nashik meeting second and fourth Sunday of every month between 1000 Hrs to 1200 Hrs, Venue Hutatma Smarak Opp District Court Nashik **

Post your feedback -

Message: Length should be min 8 charcters*

Feedback
 
 

माजी सैनिकांचे पुनर्वसन व कल्याण विषयक बाबींची प्रभावी अंमलबजावणी सरकारी यंत्रणांकडून करवुन घेण्यासाठी १९६४ मध्ये फिल्ड मार्ल करिअप्पा यांनी इंडियन एक्स सर्विसेस लीग IESL  या  राष्ट्रीय  पातळीच्या संघटनेची स्थापना केली.  भारतीय माजी सैनिक संघटना ही केन्द्र सरकार मान्यता प्राप्त आहे आणि तिला सातव्या लोकसभेत २०  एप्रील १९८२ रोजी 'अॅपेक्स स्टेटस' देण्यात आले. रॉयल कॉमनवेल्थ्य एक्स सर्विसेस लीग (RCEL)  लंडन फेडरेशन मोंडिअले बरोबर ही संघटना संलग्न आहे. भारताचे राष्ट्रपती या संघटनेचे वरिष्ठ पालक असून संरक्षण मंत्री हे मुख्य पालक व तिनही सेनांचे प्रमुख हे पालक आहेत. संघटनेचे मुख्य कार्यालय ९ न्याय मार्ग, चाणक्य पुरी, नवी दिल्ली ११००२१ येथे आहे. 

१९६८  मध्ये ले. जन. एस पी पी थोरात यांनी महाराष्ट्रात या संघटनेची राज्यस्तरीय   स्थापना केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यालय हटमेंट जे, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथे आहे. नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यालय पाटील वुडन मटेरियल, बजरंग नगर थांबा,  सातपुर अंबड लिंकरोड, संगम हॉटेलसमोर, सातपुर, नाशिक ४२२ ०१२  येथे आहे. भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक  ही धर्मादाय आयुक्त  नाशिक यांचेकडे नोंदणी क्रमांक NSK/F/६९२/८२ नुसार पंजिकृत आहे.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कार्यकारिणीची व चौथ्या रविवारी सर्व सभासदांची हुतात्मा स्मारक जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर सि बी एस जवळ नशिक येथे सकाळी साडे दहा ते साडे बारा दरम्यान बैठक घेण्यात येते. माजी सैनिकांच्या आयोजित बैठकांविषयी एस. एम. एस. व ई मेलद्वारे सभासदांना कळवण्यात येते.  तेथे प्रत्यक्ष येवुन सभासद आपल्या  स्मास्यांवर चर्चा करून इतर माहिती घेतात.  तसेच इतर वेळी भ्रमणध्वनी (mobile) email (iesl.nashik@gmail.com, ieslhelpline@gmail.com) ‘फेसबुक’ आणि 'ट्विटर'  वर आपल्या समस्या मांडतात. त्याचे निराकरण युद्ध पातळी वर करण्यासाठी  संघटना  सदैव तयार असते.

नाशिकमध्ये रहात असलेल्या माजी सैनिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटना नेहमी कार्यरत असते. नाशिक येथील रहिवासी माजी सैनिकांच्या  घरपट्टी माफीसाठी या संघटनेनेच पुढाकार घेवुन, पाठपुरावा केला. आयुक्तांची सही होवुन ते प्रकरण राज्यसरकार कडे पाठवण्यात आलेले  आहे.   पुढील अंमलबजावणीसाठी संघटना जोमाने प्रयत्न करत आहे.  नाशिक बरोबरच ओझर पंचायत व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेकडेही घरपट्टी माफीसाठी मागणी करण्यात आलेली आहे.  इतर ठिकाणांसाठीही संघटना प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी मोठयासंखेने सभासद होवुन आपली ताकद दाखवुन द्यावाची गरज आहे.

संघटनेतर्फे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातुन जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांची यादी मागवण्यात आली आहे.  त्यानुसार सर्व तालुक्यांना कार्यकारिणी भेट देते. तेथे समिती स्थापना, कार्यकारिणी निवड करून, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी आणि परिवार यांच्या समस्या जाणुन घेते. त्यांच्या निवारणासाठी प्रामाणीक प्रयत्न करणार करते.  त्यांना योजना व सुविधांची माहीती देण्यात देते. “संघटना आपल्या द्वारी” या उपक्रमातून जिल्ह्यातील तालुक्यांना भेटी देवून तालुका समिती स्थापन केल्या.   

संघटनेने माजी सैनिक मा. अण्णा हजारे यांच्या जनलोकपालसाठीच्या आंदोलनात संघटनेने अटकसत्र, उपोषण, मेणबत्ती (Candle)  मार्च, पाठींब्याचे फलक, विजय रॅली कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला. एपिल ११  व सप्टेबर ११ मध्ये राळेगणसिद्धी येथे स्वखर्चाने जावुन अण्णांची सदिच्छा भेट घेतली. जुलै ११ मध्ये नाशिक संघटनेचे खजिनदार (राज्य कार्यकारिणी चे बिनविरोध निवडून आलेले सदस्य) श्री. श्रीराम आढाव यांनी भारतीय माजी संघटना दिल्ली येथील मुख्य कार्यालयास ला स्वखर्चाने भेट दिली व माजी सैनिकांच्या समस्या अवगत करविल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले.

यावर्षी ऑगस्ट मध्ये माजी सैनिकांचा जिल्हास्तरीय मेळवा कालिका मंदिर,  नशिक  येथे घेण्यात आला. त्यास अभुतपुर्व प्रतिसाद लाभला.  सिन्नर येथील हुतात्मा स्मारकाची दयनीय स्थिती संघटनेच्या लक्षात आली. संघटनेने सतत पाठपुरावा केला.  १५  आँगस्ट २०१२  रोजी सिन्नर येथिल हुतात्मा स्मारक हे प्रशासनाकडुन या संघटनेस हस्तांतरीत करण्यात आले. मला येथे अभिमाने नमूद करावेसे वाटते कि अशाप्रकारे माजी सैनिक संघटनेकडे हस्तांतरित झालेले सिन्नर हे भारतात पहिले हुतात्मा स्मारक आहे. त्याच दिवशी हुतात्मा स्मारक सिन्नर येथे झालेल्या रक्तदान शिबिरात संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग  नोंदवला. प्रसिद्धी प्रमुख महेंद्र सोनवणे, तालुका सचिव जगन्नाथ केदार,  सदस्य सदाशिव इंगळे यांनी रक्तदान केले. महेंद्र सोनवणे यांनी २५ व्या वेळेस केलेले रक्तदान हे ह्या शिरीराचे प्रमुख आकर्षण होते.  सप्टेबर मध्ये देवळली कॅम्प नशिक येथे परिसरातील माजी सैनिकांचा यशस्वी मेळवा घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कालिका मंदिर नवरात्रोत्सव नाशिक यात्रेत मंदिर व्यवस्थापनास मदत करीत गर्दी नियंत्रण व इतर कार्यात संघटनेच्या पन्नास माजी सैनिकांनी व दहा माजी सैनिकपत्नींनी स्वयंसेवक म्हणुन उत्तम भुमिका पार पाडली. पुढील  वर्षी ही संख्या दोनशे वर नेण्याचा मानस आहे. त्यासाठी माजी सैनिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. तोफखाना केंद्र  नाशिक येथे घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याची प्रसिध्दी व पुर्ततेत संघटनेने सक्रीय सहभाग घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारने सर्व सरकारी कार्यालयांनी  (उदा. मंत्रालय, कलेक्टर, तहसिलदार, जिल्हा परिषद पोलिस स्टेशन  पंचायत)  माजी सैनिकांना सौजन्याची वागणुक देण्याविषयी दिलेल्या आदेशपात्राची प्रभावी अंमलबजावणी करविणे माजी सैनिकांसाठी शासन दरबारी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती घेवुन ती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचवणे माजी सैनिकांचे पाल्य इतर ठिकाणी शिक्षण घेत असल्यास तेथे उपलब्ध असलेल्या सैनिक वसतीगृहांविषयी माहिती पुरवणे. आरोग्यविषयक समस्यांचे  इ. सी. एच. एस. मार्फत मार्गदशन  करून उपाय व सुविधा उपलब्ध करून देणे  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत उपलब्ध योजना व त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देवुन व त्यांच्या पाठपुराव्यासाठी माजी सैनिकांना सर्वतोपरी मदत करून प्रभावी अंमल बजावणी करवुन घेणे ही कामेही संघटनेतर्फे केली जातात.

भारतीय माजी सैनिक संघटनेचे भारतातले हे  दुसरे संकेत स्थळ आहे. या संकेत स्थळाद्वारे संघटना,  माजी सैनिक व त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांविषयी माहीती सर्वांना मिळेल, तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी माजी सैनिकांतर्गत योग्य वधु वर सुचक माहीती उपलब्ध होउ शकेल.  

 IESL Footprints  

भारतीय माजी सैनिक संघटना १९८२ पासून कार्यरत आहे.
Indian Ex Services League operating since 1982
   
नाशिक जिल्हाधिकारी सैनिक दरबारच्या आयोजनात सफल सहभाग
Major role in successful event : “Collector NashikSainikDarbar
 
सदस्यांसाठी SMS service  : ९४२३२२२९८५, ९०२१०३३९९९  या भ्रमणध्वनीवर
Mobile SMS Service for registered members on 9423222985, 9021033999
 
नाशिक जिल्हा माजी सैनिकांसाठी घरपट्टी माफी चा पाठपुरावा
NashikDistrict ESM House Tax exemption follow up
 
ECHS च्या वैद्यकीय सोयींची दूर स्थित माजी सैनिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील
ECHS  liaison  for Medical facility extension to remote and distant ESM  
 
भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक जिल्हा मुख्य कार्यालयाचे उद्घाटन
Indian Ex Services League NashikDistrict  Office  Opening
 
भारतीय माजी सैनिक संघटना नाशिक फेसबुकमदत संकेत केंद्र
Online  Helpline  Suggestion box on Facebook
 
राळेगणसिद्दी : माननीय अण्णांची भेट घेवून त्यांचा कार्यास पाठींबा व तसे पत्रक दिले
Ralegansiddhi  Visit :  Meeting with Anna and Support letter handed over
 
जिल्हा सैनिक कार्यालयसंपर्क वृद्धी व सैनिकांच्या समस्यांसाठी एकास्तरावर प्रयत्नशील
Good liaison with ZilhaSainikBoard Nashik  for  “ESM Welfare One Platform”   
 
शहीद स्मृती दिन, क्रांतीदिनध्वजारोहण, स्वतंत्रता सेनानी व माजी सैनिकसत्कारसमारोह
Shahid Smritidin Ceremony 
KRANTIDIN Flag Hoisting, Freedom Fighter & ESM Honouring
 
“संघटना आपल्या दारी”,या ब्रीद प्रमाणे TalukaConnect Mission, तालुका समिती निवड व बैठक
“IESL at your Home” : TalukaConnect Mission, TalukaCommittee Election & Meeting


नाशिक आधार तीर्थ आधाराश्रामास भेट व फळ वाटप
NashikAdharTirhAshram Visit and Fruit distribution

"Support Anna" निवेदन जिल्हाधिकारी नाशिक यांना सुपूर्त
“IESL Support Anna” letter to Collector Nashikby CC

भामासैसंनाशिक, कार्यकारिणीजेलभरोआंदोलन अटकसत्र
IESL  CC  Support Anna arrest

भामासैसंनाशिक, सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालासमोर साखळी उपोषण
IESL NashikMember’s Chain Fasting at  Collector office for ESM issues

विजय-शांती फेरी : हुतात्मा स्मारक नाशिक  
Vijay-Shanti Rally HutatmaSmarakNashik

नूतन ओळख पत्र वितरण
New Identity Card distribution

भामासैसं  सदस्यांचा Candle  March
IESL Member’s Candle March

मदत संकेत केंद्र ieslhelpline@gmail.com वर विस्तारित
Help Line hoisted on Gmail   :  
ieslhelpline@gmail

भामासैसं महाराष्ट्राच्या सदस्यांची, भामासैसं  नाशिकच्या प्रगतीचे कौतुक
IESL Maharashtra appreciated the IESL NashikFootprints

राळेगण सिद्धी येथे जावून आणची सदिच्छा भेट.  
Sadichhabhetto Anna At RaleganSiddhi
 

कालिका माता मंदिर नवरात्रोत्सव स्वयंसेवक व सुरक्षा योगदान.
Volunteered Security at Kalika Mata Navaratrotsav

वीर माता, वीर पिता, वीर पत्नी सत्कार समारोह आयोजन.
Vir Mata, Vir Pita, Vir Patni Satkar Samaroh. 

 

 
IESL Members vouluteering at Kalika mata Navarotrotsava 2013


MELAVA1

organization | management | join us | news letter | financial assistance | career / help line | donations | disclaimer
^ Back to Top
       

© 2018 IESL Nashik, All rights reserved